खेडच्या पश्चिम पट्यात निसर्गाचा खजिना
चास, ता. ३ : धरतीवरचा स्वर्ग म्हणजेच खेड तालुक्याच्या पश्चिम पट्टा, हा स्वर्ग खुलतो तो पावसाळ्यात, निसर्गाने संप्पन असलेल्या या पट्ट्यात पावसाने निसर्ग खुलला असून नयनरम्य धबधबे, दुधडी भरून वाहणारे भिमेचे पात्र, खळखळत वाहणारे ओढे नाले व हिरवाईने नटलेला हा परिसर, स्वच्छ, सुरक्षीत व निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी खेडच्या पश्चिम पट्यात या मुळे निसर्गप्रेमींसह पर्यटक वाढू लागले आहेत.
सह्याद्रिच्या डोंगररांगांनी व्यापलेला तालुक्याचा हा पश्चिम पट्टा म्हणजे निसर्गाचा अदभूत खजीना आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या परिसराचे सौंदर्य खुलते ते खऱ्या अर्थाने पावसाळ्यात. सह्याद्रिच्या डोंगररांगांनी व्यापलेला हा परिसर म्हणजे शिरूर-भिमाशंकर राज्यामार्गाच्या एका बाजूस ह्या विस्तृत डोंगररांगा तर दुसऱ्या बाजूस चास कमान धरणाचा विस्तृत प्रमाणात पसरलेला जलाशय. या भागात गेली काही वर्षापासून पावसाळ्यात आवर्जून भेट देणाऱ्यांची संख्या वाढत असून या भागातील डोंगररांगांमधून कोसळणारे धबधबे तरूणाईचे विलक्षण आकर्षण ठरताहेत. पुण्यापासून साधारण ८० चे ८५ किलोमीटर तर राजगुरूनगर (खेड) पासून ४० ते ४२ किमी. अंतरावर असलेल्या या परिसरात जाण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे जाळे असून स्वताच्या गाडीने किंवा एस. टी. महामंडळ वा खाजगी गाड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पर्यटनाची सुरूवात होते ती वाडा गावाच्या उत्तरेस डोंगर कपारीत असलेले गडदूदेवीचे सुंदर मंदिर व मंदिरावरील डोंगरावरून कोसळणारा नयनरम्य धबधबा व तेथून पुढे सुरू होते धबधब्यांची मालीका. शिरगांव-धुवोली येथील नयनरम्य नेकलेस धबधबा, मंदोशी घाटमाथ्यावरील आकर्षक धबधबा, टोकावडे कारकुडी रस्त्यावरील सुमारे दोनशे फुट दरीत कोसळणारा धबधबा व त्याच्या आसपास चिंब भिजण्यासाठी असलेले आकर्षक धबधबे, भिवेगांव, भोरगिरी येथील मनमोहक धबधबे पर्यटकांना आकर्षीत करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.