तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी संदिप मेदगे

तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी संदिप मेदगे

Published on

चास, ता. १ ः खेड तालुका महा-ई सेवा व आधार केंद्र संघटनेच्या अध्यक्षपदी चास येथील संदिप मेदगे यांची निवड करण्यात आली. तर, सहसचिवपदी वाडा येथील स्वाती येवले यांची निवड झाली. कार्यकारिणीमध्ये शुभांगी शिंदे (उपाध्यक्ष), अॅड. संतोष कौदरे (कार्याध्यक्ष), तेजस्वीनी साठे (सचिव), प्रणव केदारी (कोषाध्यक्ष), अॅड. सत्यवान वाळुंज (विधीतज्ज्ञ), राणी खरमाटे, प्रतिभा कांबळे, अजय कचरे, दिगंबर नाणेकर (सदस्य) यांचा समावेश आहे. निवडीनंतर मेदगे म्हणाले की, ‘‘कोणत्याही अडचणीत संघटना प्रत्येकाच्या पाठीशी ठामपणे उभी असेल. सर्वांना बरोबर घेऊन समन्वय तसेच संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल.’’

Marathi News Esakal
www.esakal.com