खेडमध्ये रब्बी पिकांच्या समाधानकारक पेरण्या
चास, ता. ९ ः नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी खेड तालुक्यात रब्बी हंगामात फक्त ६५.३८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, पेरण्या वा लागवडी झालेल्या पिकांची स्थिती कांदा पीक सोडल्यास समाधानकारक असल्याचे चित्र आहे. सर्वाधिक उत्पादन असणाऱ्या पिकांमध्ये ज्वारीची ९०.९० टक्के क्षेत्रावर, तर मक्याची ८९.०७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
पावसाच्या लहरीपणाला आता शेतकरी वैतागला असून, चालू वर्षी मे महिन्यातच सुरू झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांची वाताहत केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना ना पेरणीपूर्व मशागतींना वेळ मिळाला ना सद्यःस्थितीत भात पिकाच्या कापणीला. मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची काढणी रखडली असून, अनेक ठिकाणी भाताची कापणी थोड्याफार प्रमामात सुरू आहे. मात्र, अशा स्थितीत असताना पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन व अन्य पिकांची काढणी करून मोकळ्या झालेल्या उपलब्ध क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरण्या करण्यास, तसेच कांदा, बटाटा व अन्य पिकांची लागवड केली आहे.
रब्बी हंगामाचे क्षेत्र ३१००४.०८ हेक्टर असून, सरासरी पेरण्या २०२७१.३० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याचे प्रमाण ६५.३८ टक्के आहे.
खेड तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र (कंसात हेक्टरी पेरणी झालेले क्षेत्र व टक्केवारी हे.) ः
तृणधान्ये- ज्वारी- ८८७४.०८ (८०६७.००, ९०.९० टक्के), गहू- १५४७.०६ (१३४.४०, ८.६८ टक्के ), मका- २००९.०६ ( १७९०.००, ८९.०७ टक्के ).
कडधान्य- हरभरा- १८७९.०४ (९९९१.४०, ८०.३३ टक्के), इतर कडधान्ये- ६५७.०० (१५.०५, २.३६ टक्के).
गळीतधान्य- करडई- ००, तीळ- ००, जवस- ००, सूर्यफूल- ००.
भाजीपाला- कांदा- ६२०० (३८७७, ६२.५३ टक्के), टोमॅटो- २५५ (५९.००, २३.१४ टक्के), बटाटा- २०७५ (४७२.०५, २२.७७ टक्के).
04018
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

