चासच्या पशुचिकित्सालयास समस्यांचा विळखा

चासच्या पशुचिकित्सालयास समस्यांचा विळखा

Published on

राजेंद्र लोथे : सकाळ वृत्तसेवा
चास, ता.१४ : चास (ता. खेड) येथे पशुचिकित्सालयाच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. छताला लागलेली गळती, रस्त्याची झालेली दुरवस्था, तुटलेले कूंपन अशा विविध समस्यांच्या विळख्यात दवाखाना सापडला आहे.

पशुवैद्यकिय अधिकारी म्हणून डॅा. पूजा बोंबले कार्यरत आहे. त्यांचे पथक जनावरांवर व्यवस्थीत उपचार करतात. वेळेवर येथे डॅाक्टर व कर्मचारीवर्ग उपलब्ध राहून पशुपालकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात.


यांची आहे गरज
- स्वच्छतागृहाच्या टाकीचे काम, पाण्याची व्यवस्था व परिसर स्वच्छता.
- पाण्याची नवीन टाकी बसविणे
- दवाखान्यापर्यंत एक सिमेंटचा रस्ता आवश्‍यक

एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या..........२०५
वंध्यत्व निर्मूलन संख्या..........१८६

लसीकरण
लाळ्या खुरकत ..........३४३६
लंपी..........२६२०
पीपीआर/इटी (मेंढी व शेळी)..........२६२०
रेबीज..........००

परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
लंपी
थायलेरिया


वैरण बियाणे वितरण..........मका, ज्वारी (२३० किलो ग्रॅम)
चारा उत्पादन क्षेत्र.......... ४० हेक्टर
गावातील सिंचित ओलिताखाली क्षेत्र..........३४० हेक्टर


लसीकरण वेळच्या वेळी करून घ्यावे
सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी १) चास येथे उपलब्ध असणारी विविध प्रकारची औषधे उदा. जंतनाशके, मिनरल मिक्सचर, चाटण विटा इत्यादींचा लाभ घ्यावा. एफ-एम-डी, लंपी आदींचे लसीकरण वेळच्या वेळी करून घ्यावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. पूजा बोंबले यांनी केले आहे.

पशुपालकांसाठी डेअरी व्यवस्थापन अंतर्गत शिबिरे आयोजित केली जातात. जिल्हास्तर व राज्यस्तरिय योजनांची माहिती दिली जाते. जनावरांचे गाभण काळातील व्यवस्थापन व कालवडींचे संगोपन या बाबत मार्गदर्शन करण्यात येत असून वैरण विकास योजना ज्या शासनांतर्गत राबविल्या जातात.
- डॉ. पूजा बोंबले, पशुधन विकास अधिकारी.

04035

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com