चास ग्रामपंचायत झाली डिजिटल

चास ग्रामपंचायत झाली डिजिटल

Published on

चास, ता.१४ : खेड तालुक्यातील चास ग्रामपंचायत आता डिजिटल झाली आहे. आता सर्व प्रकारचे कर आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने भरता येणार असून ग्रामपंयातीच्या वसुलीत वाढ होणार आहे.
डिजिटल ग्रामपंचायत अंतर्गत चास ग्रामपंचायतीकडून सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली असून आता नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कर भरण्याची गरज राहिलेली नाही. चास गावातील बहुतेक नागरिक हे व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास आहे. ते गावाकडे फक्त मोठा सण, यात्रा यासाठीच आवर्जून येतात व आल्यावर ग्रामपंचायतीचा कर भरणा व अन्य कामेही पार पडतात. मात्र, यामुळे ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न झाल्याने ग्रामपंचायतीला विकासकामे करताना अडचणी येतात. मात्र, आता घरबसल्या आपल्या मोबाइलवरून ग्रामपंचायतीचा कर भरणा करणे शक्य झाले आहे. शिवाय कराची पावतीही लगेच ऑनलाइन पद्धतीने दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मिळकतीचा क्युआर कोड तयार करण्यात आला आहे. या कोडचे वितरणही करण्यात आले. या कोडचे स्कॅनिंग करताच आपल्या स्थावर मालमत्ते (संपूर्ण प्रॅापर्टी)ची माहिती मिळणार असून त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या मिळकतीची माहिती मिळणार आहे. या ऑनलाइन सेवेचे उद्‌घाटन सरपंच विनायक मुळूक, उपसरपंच सुनील वाळूंज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप ढमढेरे, जावेद इनामदार, राजेंद्र घाटकर, संदीप ढमढेरे, आशा टोके, सविता टोके, स्वाती गायकवाड, पूनम रासकर, सविता रहाणे, ग्रामपंचायत अधिकारी प्राजक्ता डोके, उद्योजक प्रकाश कर्वे, जयंत साठे, विश्र्वास मुळूक, नीलेश घेवडे, रामभाऊ नाईकरे, अतुल रोडे उपस्थित होते. यावेळी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी घेण्यात आलेल्या ट्रॅक्टर तसेच ट्रॅालीचे उद्‌घाटनही करण्यात आले.

4050

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com