मंदोशीत गॅस सिलिंडरचा स्फोट

मंदोशीत गॅस सिलिंडरचा स्फोट

Published on

चास, ता.१४ : मंदोशीची जावळेवाडी (ता. खेड) येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराचे छत कोसळले असून एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा घरात असलेले पूर्ण क्षमतेने भरलेले दोन सिलिंडर आगीच्या संपर्कात आले असते तर मोठा अपघात घडला असतात.
जावळेवाडी येथील शांताबाई सीताराम गोडे यांच्या घरामध्ये शनिवारी (ता.१३) रात्री स्फोट झाला. याबाबतची माहिती अशी की, शांताबाई व त्यांचे कुटुंबीय शेजारच्या घराच्या अंगणात बसले होते. त्यावेळी आपल्या घरामधून गॅसचा वास येत असल्याने या बाबत शांताबाई यांचा पुतण्या लहू गोडे हे घरात गेले. त्याचवेळी मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की घराच्या वरील बाजूचे छत म्हणून वापरलेले टी अँगल व फरशी पूर्णपणे फुटून खाली पडली. त्याच्या वरच्या मजल्यावरील पत्रेही फुटले. वरच्या मजल्यावरील कुटुंब परगावी गेल्यामुळे ते या अपघातातून वाचले मात्र त्यांच्या घरात असलेले पूर्ण क्षमतेने भरलेले दोन सिलिंडर आगीच्या संपर्कात आले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत सुरू करून लहू यांना रुग्णालयात दाखल केले.
केवळ शांताबाई व त्यांचे कुटुंबीय घराच्या बाहेर असल्यामुळे बचावले.
दरम्यान, संबंधित गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.


04127

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com