आखरवाडीत दर्शनासाठी ग्रामस्थ, कार्यकर्त्यांची गर्दी
चास, ता. ४ ः ‘‘खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जी विकासाची गंगा वाहते आहे, त्याचे सर्व श्रेय आजितदादांना आहे. ताकदीचा नेता असल्याशिवाय विकासकामे होत नाहीत. अजितदादा सारखा प्रचंड ताकदीचा असलेला महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर नेता हरपला असून, आज दादा हयात नाही. मात्र, आपण सर्वांनी दादांच्या स्मृती जपण्याचे काम करायचे आहे,’’ असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे मंगळवारी (ता. ३) रात्री खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आखरवाडी व परिसरात आगमन झाले. आखरवाडी (ता. खेड) येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात फुलांनी सजविलेल्या रथात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवला होता. यावेळी मोहिते बोलत होते.
अस्थिकलशाचे परिसरात आगमन होताच संपूर्ण परिसर शोकमग्न झाला. आपल्या लोकप्रिय नेत्याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी चास, आखरवाडी, कमान, कान्हेवाडी, कडधे परिसरातील नागरिकांनी मोठा गर्दी केली. अस्थिकलशाचे दर्शन घेताना अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते.
याप्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष नीलेश थिगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल राक्षे, राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगरसेवक वैभव घुमटकर, माजी सभापती अंकुश राक्षे, बहिरवाडीच्या सरपंच वसुधा राक्षे, कडधेच्या माजी सरपंच प्रियांका देवदरे, जगन्नाथ राक्षे, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक, वैभव नाईकरे, अनिल मुळूक, सुरेश मुळूक, गणपतराव मुळूक, नामदेव तनपुरे यांसह परिसरातील ग्रामस्थ, विविध संस्थांचे कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
04274
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

