खेडमध्ये गुलाल, भंडाऱ्याची उधळण
चास, ता.९ : खेडच्या हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला तुरळक गर्दी असलेल्या निकालाच्या ठिकाणी जसजसे निकालाचे कौल आले तसतशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. निर्णायक आघाडी घेतल्यावर विजयाचा जल्लोष सुरू झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत शेकडो कार्यकर्ते बेफाम होऊन नाचू लागले. क्रीडा संकुलाजवळील चास-कमान कालव्यालगत मोठ्या प्रमाणात गुलाल व भंडाऱ्याचा खच साचला होता.
विशेष बाब म्हणजे नाणेकरवाडी गटातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजय गृहीत धरलेला असल्याने निकालाला येतानाच पै. गणेश कांताराम बोत्रे जिल्हा परिषद सदस्य असा नामफलकच तयार करून आणला होता व तो मिरवणुकीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. वाडा, कडूस, रेटवडी, पिंपळगाव, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरुळी या सर्वच गट तसेच गणातील उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
उपमुख्यमंत्री व आमच्या पक्षाचे नेते स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आम्ही प्रचाराला बाहेर पडलो नाही, सहानुभूती लोकांनी दाखवली नाही, तालुक्यात मनी आणि मसल पावर जास्त चालली मात्र हे पुढच्या काळात धोकादायक होणार असून आमचे कार्यकर्ते फोडून विरोधकांनी उमेदवारी दिले त्यामुळे आम्हाला धोका झाला मात्र आम्ही आमचा पराभव मान्य करतो, पुढच्या काळात जोमाने कामाला लागून पुन्हा तालुक्यात आम्ही पुढे येवू.
- दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार
4301
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

