हिवरे येथे वनविभागाने लावला पिंजरा

हिवरे येथे वनविभागाने लावला पिंजरा

Published on

खोडद, ता.३ : हिवरेतर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे शिवदास खोकराळे यांच्या घराच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. यापूर्वी या परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या पाहायला मिळत होता. आता मात्र बिबट्याची मादी आणि तिचे दोन बछडे दिवसाही बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. यामुळे येथे वनविभागातर्फे
मंगळवारी (ता. २) पिंजरा लावण्यात आला.

सोमवारी (१ जुलै) पहाटेच्या सुमारास हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकरी मधुकर सुदाम खोकराळे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला होता. यावेळी खोकराळे यांनी आरडाओरडा करून बिबट्याला हाकलून लावले. दरम्यान, पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी नीलेश खोकराळे, नगदवाडी शीघ्र कृती दलाचे सोमनाथ भालेराव, बबन निकम, ऋषिकेश गायकवाड यांनी येथे पिंजरा लावला.

दरम्यान, बिबट्याने खोकराळे यांच्या घराच्या गेटच्या कंपाऊंडवरून उडी मारून आत प्रवेश केला होता. मात्र खोकराळे यांच्या सतर्कतेमुळे बिबट्या तेथून निघून गेला.
आता सध्या बिबट्याची मादी तिच्या बछड्यांसह येथे मुक्तपणे वावरताना अनेकदा खोकराळे यांनी पाहिले आहे.या बिबट्याचे बछडे ऊसातून बाहेर येऊन रस्त्यावर खेळत आहेत.या बछड्यांना रस्त्यावर खेळताना अनेकदा पाहायला मिळाले आहे.


00789

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.