पारगावतर्फे आळे सोसायटीकडून 
सभासदांना १५ टक्के लाभांश

पारगावतर्फे आळे सोसायटीकडून सभासदांना १५ टक्के लाभांश

Published on

खोडद, ता. ३० : पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ७९वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या आर्थिक वर्षात सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
संस्थेचे अध्यक्ष नितीन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात पीककर्ज, मध्यम मुदत कर्ज, थकीत वसुली आदी कामांसाठी संस्थेला चालू आर्थिक वर्षात ऑडिट ‘अ’ वर्ग मिळाला आहे, असे अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी संस्थचे सचिव किरण डुकरे यांनी अहवालाचे वाचन केले. बँक पातळीवर संस्थेची १०० टक्के वसुली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विषय पत्रिकेवर असलेल्या सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. संस्थेचे संचालक सचिन डुकरे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. यावेळी शिवाजी चव्हाण, सरपंच रेश्मा बोटकर, उपसरपंच रामचंद्र डुकरे, संभाजी चव्हाण, गोपालकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, विकास अधिकारी विलास औटी, देवराम तट्टू, विकास चव्हाण, भिवसेन येवले, हरिभाऊ डुकरे, गंगाराम डुकरे, फकीरा पाबळे, प्रकाश भांबेरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी डुकरे, देवराम डुकरे, रामदास चव्हाण आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com