हिवरेतर्फे नारायणगावात धावले ४७० बैलगाडे
खोडद, ता.७ : हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे मुक्ताबाई यात्रेनिमित्त शुक्रवारी ते रविवारी (ता. ३, ४ व ५) या तीन दिवस आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत ४७० बैलगाडे धावले.
बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्या नंबरात आलेले बैलगाडे पुढीलप्रमाणे व कंसात सेकंद : पहिल्या दिवशी १५६ बैलगाडे धावले.प्रथम क्रमांकात ३८ बैलगाडे आले.द्वितीय क्रमांकात २०४ बैलगाडे आले तर तृतीय क्रमांकात १२३ बैलगाडे आले. पहिल्या दिवशी डॉ.संतोष वायाळ यांचा बैलगाडा (११.९०) फळीफोडमध्ये आला. दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब पोखरकर यांचा बैलगाडा (११.९२) फळीफोडमध्ये आला. तिसऱ्या दिवशी शशिकांत भालेराव यांचा बैलगाडा (११.८२) फळीफोडमध्ये आला. पहिल्या दिवशी घाटाचा राजा स्वराज शिवले यांचा बैलगाडा (११.५३), दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा आकाश पोखरकर आणि धनंजय चौधरी व रोहिदास भोर यांची जुगलबंदी (११.५५), तिसऱ्या दिवशी घाटाचा राजा मुक्ताई कार केअर व रिद्धेश बांगर यांची जुगलबंदी (११.५३), २० फुटांवरून कांडे प्रथम क्रमांकात कार्तिकराजे बांगर. पहिल्या दिवशी स्वराज शिवले यांचा बैलगाडा (११.६७) फायनलमध्ये पहिला आला. दुसऱ्या दिवशी आकाश पोखरकर, धनंजय चौधरी व रोहिदास भोर यांचा बैलगाडा (११.६७) फायनलमध्ये पहिला आला.तिसऱ्या दिवशी रितेश बांगर आणि साईराज बारणे यांचा बैलगाडा (११.७८) फायनलमध्ये पहिला आला. तीन दिवसात सर्वात कमी सेकंदात येणारा प्रदीप टिंगरे आणि राजवर्धन भागवत यांचा बैलगाडा (११.३७) धावला. तीन दिवसात सर्वात आकर्षक भारी अनुराज खोकराळे, गोविंद काळे, संदेश मंडलिक, रूपेश खिलारी यांचा बैलगाडा आकर्षक बारी ठरला.
पहिल्या नंबरसाठी १ लाख रुपये, दुसऱ्या नंबरसाठी ७५ हजार रुपये, तिसऱ्या नंबरसाठी ४१ हजार रुपये, पहिल्या फळीफोडसाठी १५ हजार रुपये, दुसऱ्या फळीफोडसाठी १० हजार रुपये, तिसऱ्या फळीफोडसाठी ७ हजार ५०० रुपये, पहिल्या क्रमांकात फायनल येणाऱ्या गाड्यासाठी ३ मोटारसायकली, दुसऱ्या क्रमांकात फायनल येणाऱ्या गाड्यासाठी ३ वॉशिंग मशिन, तिसऱ्या क्रमांकात फायनल येणाऱ्या गाड्यासाठी ३ फ्रिज, चौथ्या क्रमांकात येणाऱ्या फायनलसाठी ३ एलसीडी टीव्ही आदी बक्षीसे देण्यात आली.
01646