मांजरवाडी घराच्या ओट्यावर एकाचवेळी पाच बिबटे

मांजरवाडी घराच्या ओट्यावर एकाचवेळी पाच बिबटे

Published on

खोडद, ता.१६ : मांजरवाडी (ता.जुन्नर) येथील स्वामीनगरमधील शेतकरी शरद रघुनाथ मुळे यांच्या घराच्या ओट्यावर बुधवारी (ता. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास एकाच वेळी पाच बिबटे वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जुन्नर तालुक्यातील जंगलात आढळणारा बिबट्या मागील २५ वर्षांपासून उसाच्या शेतीमध्ये विसावला आणि ऊस शेतीच त्याचा अधिवास झाला. सहज मिळणारे भक्ष्य, पिण्यासाठी सहज उपलब्ध होणारे पाणी आणि लपण्यासाठी उसासारखी सुरक्षित जागा या सगळ्या पोषक वातावरणामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. बिबट्यांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील पोषक वातावरण आहे.या पोषक वातावरणामुळे विशेष म्हणजे बिबट्यांची प्रजनन क्षमता देखील वाढली आहे. बिबट मादी वर्षातून एकदा बछड्यांना जन्म देते.पूर्वी बिबट्याची मादी एकाच वेळी दोन ते तीन बछड्यांना जन्म द्यायची, पण आता मात्र ती एकाचवेळी चार बछड्यांना जन्म देत आहे. मागील एक ते दीड वर्षांत बिबट मादीने एकाच वेळी चार पिलांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी आईपासून दुरावलेले सुमारे ५० ते ६० बिबटे वनविभागाने ताब्यात घेऊन त्यांना परत नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या आईच्या ताब्यात दिले होते. या बछड्यांमुळे यावर्षी पुन्हा बिबट्यांच्या संख्येत अधिक वाढ झाली आहे.

नागरिकांनी वेळोवेळी या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली, वनविभागाने देखील सातत्याने राज्य सरकार व केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून प्रस्ताव पाठवण्याचे काम केले, मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही आणि आज त्याचाच एक दुष्परिणाम नागरिकांना, शेतकऱ्यांना व लहान मुलांना भोगावा लागत आहे.
01678

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com