नादुरुस्त बसचा प्रवाशांना नाहक त्रास
खोडद, ता. ११ : नारायणगावहून खोडद आणि साकोरीकडे जाणारी बस वारंवार बंद पडत असल्याने हिवरेतर्फे नारायणगाव, खोडद, खोडद फाटा, सुलतानपूर, शिरोली, निमगाव सावा आणि साकोरी या गावांमधील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नारायणगाव खोडद रस्त्यावरील गव्हाळी मळ्यात मंगळवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास ही बस बंद पडली. यामुळे बसमधील विद्यार्थी व नागरिक रस्त्यावर उभे राहून खोडदकडे जाणाऱ्या वाहनांना हात करून इच्छित स्थळी पोहचण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. नादुरुस्त बस प्रवाशांच्या वाहतूक सेवेसाठी वापरली जात असल्याने प्रवाशांच्या वाहतुकीचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
नारायणगाव आगारातून नारायणगाव साकोरी अशी बस सेवा सुरू केली आहे. या मार्गावर नेहमी हीच बस सोडण्यात येते. ही बस अनेकदा नादुरुस्त असल्याने ही बस वांरवार बंद पडते. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक या बसने प्रवास करतात. ही बस आतापर्यंत या रस्त्यावर अनेकवेळा बंद पडली आहे. वारंवार बंद पडणाऱ्या या बसमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
नारायणगाव आगाराकडून बस नियमित वेळेत सोडली जात नाही. यामुळे विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात भर म्हणजे ही नादुरुस्त बस नेहमी याच मार्गावर सोडली जाते. आतापर्यंत ही बस अनेकवेळा या रस्त्यावर ठिकठिकाणी बंद पडली आहे.
- जगन खोकराळे, अध्यक्ष, ग्राहक पंचायत, जुन्नर तालुका
01736
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

