Sun, Feb 5, 2023

सोनवडी येथे घरफोडीत ३१ हजाराचा ऐवज लंपास
सोनवडी येथे घरफोडीत ३१ हजाराचा ऐवज लंपास
Published on : 3 January 2023, 3:25 am
दौंड, ता. ३ : सोनवडी (ता. दौंड) येथे झालेल्या घरफोडीत ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला, अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली. अनिल शंकर राठोड यांच्या घरातून रविवारी (ता. १) मध्यरात्री ही चोरी झाली. यामध्ये चोरट्याने घरातील १६ हजार रुपये रोख रक्कम व १५ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल चोरून नेला आहे. या प्रकरणी दौंड पोलिस तपास करत आहेत.