Mon, Feb 6, 2023

शिष्यवृत्ती परीक्षेत दौंडची शरयू राज्यात सहावी
शिष्यवृत्ती परीक्षेत दौंडची शरयू राज्यात सहावी
Published on : 5 January 2023, 9:51 am
दौंड, ता. ५ : महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दौंड येथील श्रीमती शांताबाई काळूराम ठोंबरे प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी शरयू बापू मेरगळ हिने २९८ पैकी २८६ गुण मिळवून राज्यात सहावा, जिल्ह्यात दुसरा व दौंड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच विद्यालयातील श्रावणी गोवर्धन मगर या विद्यार्थिनीने २९८ पैकी २४२ गुण मिळवून दौंड तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला. दोन्ही विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, सचिव हरिश्चंद्र ठोंबरे, मुख्याध्यापक लक्ष्मण दुधाट व वर्गशिक्षिका श्रेया जाधव यांनी अभिनंदन केले.