दौंडमधील ४७ जणांवर गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमधील ४७ जणांवर गुन्हे दाखल
दौंडमधील ४७ जणांवर गुन्हे दाखल

दौंडमधील ४७ जणांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By

दौंड, ता. २० : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांचा दौंड शहरातील दौरा रद्द झाला, परंतु त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी व स्वागतासाठी बेकायदा जमाव जमवणाऱ्या ४७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दौंड शहरात १७ जानेवारी रोजी भिडे यांचा दौरा नियोजित होता. मात्र, उशीर झाल्याने ते दौंड शहरात न येता शहरातील नगर मोरीमार्गे बारामतीच्या दिशेने रवाना झाले. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधितांना कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे कृत्य न करण्याची सूचना दिली होती. दौऱ्याच्या दिवशी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भिडे यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आदी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी जमा झाले होते. त्यामुळे पोलिसांनी जमाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष अमित सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आश्विन वाघमारे यांच्यासह एकूण २६ जणांवर १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. तर, छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिडे यांच्या स्वागतासाठी जमून जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष श्रीनाथ ऊर्फ बाळू ननवरे यांच्यासह एकूण २१ जणांवर १९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.

पोलिस ठाण्याबाहेर उपोषण
दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्यावर अॅट्रोसिटी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करणे आणि जमावबंदी उल्लंघन प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आश्विन वाघमारे, अमित सोनवणे, आदींच्या पुढाकाराने आज (ता. २०) उपोषण सुरू केले आहे.