दौंड शहरातून दुचाकीची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड शहरातून 
दुचाकीची चोरी
दौंड शहरातून दुचाकीची चोरी

दौंड शहरातून दुचाकीची चोरी

sakal_logo
By

दौंड, ता. ३ : दौंड शहरात महाराष्ट्र बॅंक शाखेसमोरून दुचाकी; तर रेल्वे क्वॅार्टर्समधून दुचाकीचे टायर चोरीस गेले.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, उत्तम येदू जाधव (वय ६१, रा. गिरीम, ता. दौंड) यांची महाराष्ट्र बॅंक शाखेसमोर लावलेली काळ्या रंगाची हिरो कंपनीची एच.एफ. डीलक्स मॅाडेल असलेली दुचाकी चोरीस गेली. ३१ जानेवारी रोजी दुपारी अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान दुचाकीचे हॅण्डल लॅाक तोडून ही चोरी झाली. सदर दुचाकी चोराच्या शोधासाठी बॅंक शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण सदोष असल्याने ते पोलिसांना उपयोगी पडू शकले नाही. तर, शहरातील आरबीवन रेल्वे क्वॅार्टर्स येथे विकास शंकर कांबळे (वय ३४) यांची रेल्वेच्या घरामागे लावलेल्या होंडा शाईन दुचाकीचे पाठीमागील ट्यूबलेस टायर चोरीस गेले. ३० जानेवारी रोजी हे टायर चोरीस गेले.