डोक्यात वीट पडून मुकादमाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोक्यात वीट पडून 
मुकादमाचा मृत्यू
डोक्यात वीट पडून मुकादमाचा मृत्यू

डोक्यात वीट पडून मुकादमाचा मृत्यू

sakal_logo
By

दौंड, ता. १० : लिंगाळी (ता. दौंड) येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डोक्यात वीट पडून एका मुकादमाचा मृत्यू झाला. श्रीकिशन अंबाजी कांबळे (वय ५१, रा. देवकीनगर, दौंड) असे मृत मुकादम यांचे नाव आहे. सुरक्षा उपाययोजना न करता सुरू असलेल्या बांधकामावर हा प्रकार घडला.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, श्रीकिशन अंबाजी कांबळे (वय ५१, रा. देवकीनगर, दौंड) असे मृत मुकादम यांचे नाव आहे. लिंगाळी हद्दीत पासलकर वस्ती येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ७ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. सेंट्रिंगचे काम करीत असताना कांबळे यांच्या डोक्यात वीट पडल्याने ते बेशुद्ध झाले. मात्र, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात विशाल श्रीकिसन कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. याबाबत अंमलदार किरण ढुके हे पुढील तपास करीत आहेत.