Tue, March 21, 2023

दौंड शहरातून दुचाकीची चोरी
दौंड शहरातून दुचाकीची चोरी
Published on : 28 February 2023, 2:19 am
दौंड, ता. २८ : दौंड शहरात भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या नागरिकाचे दुचाकी वाहन भरदुपारी बाजारतळ परिसरातून चोरीस गेले. याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, रामकृष्ण ज्ञानदेव जाधव (वय ४९, रा. निमगाव खलू, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांची हिरो कंपनीची आय स्मार्ट मॅाडेल दुचाकी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी चोरीस गेली आहे. ते बाजारतळाजवळील श्री मारुती मंदिरासमोर दुचाकी उभे करून भाजीपाला आणण्यासाठी मंडईत गेले असता दुचाकी चोरीस गेली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.