ऊस तोडणी मजुरांची टोळी देण्याच्या आमिषाने फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस तोडणी मजुरांची टोळी 
देण्याच्या आमिषाने फसवणूक
ऊस तोडणी मजुरांची टोळी देण्याच्या आमिषाने फसवणूक

ऊस तोडणी मजुरांची टोळी देण्याच्या आमिषाने फसवणूक

sakal_logo
By

दौंड, ता. ११ : नानवीज (ता. दौंड) येथील पुरवठादारास ऊस तोडणीकरिता मजुरांची टोळी पुरवण्याच्या आमिषाने मुकादमाने दहा लाख रुपयांची उचल घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दौंड पोलिसांनी या प्रकरणी एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, बाबासाहेब पंढरीनाथ पासलकर (रा. हडपसर) या पुरवठादाराने सुदाम दुधा राठोड (वय ४७ , रा. गुजरदरी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या मुकादमाच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पासलकर हे दौंड तालुक्यातील एका खासगी साखर कारखान्यास ऊस तोडणीकरिता मजूर पुरविण्याचा व्यवसाय करतात. मुकादम सुदाम राठोड याने सप्टेंबर २०२२ मध्ये ऊस तोडणी हंगाम २०२२-२०२३ करिता तोडणी मजुरांची टोळी पुरवितो, असा करार करून पासलकर यांच्याकडून वेळोवेळी एकूण दहा लाख रुपये बॅंक खात्यात ऑनलाइन ट्रान्स्फर पद्धतीने, रोखीने व फोन पेद्वारे स्वीकारले. मात्र, ठरल्याप्रमाणे दहा टोळ्या न पुरविता फक्त सहा टोळ्या ऑक्टोबर २०२२ मध्ये नानवीज येथे पुरविल्या. त्यापैकी एक टोळी पंधरा दिवसात, तर पाच टोळ्या जानेवारी महिन्यात न सांगता निघून गेल्या. ऊस गळीत हंगामास तीन महिने बाकी असताना मजुरांच्या टोळ्या न पुरविता दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.