Thur, March 23, 2023

दौंड - दाट लोकवस्तीमध्ये घरफोडी
दौंड - दाट लोकवस्तीमध्ये घरफोडी
Published on : 19 March 2023, 2:41 am
दौंड शहरात घरफोडी
दौंड, ता. १९ : दौंड शहरात दाट लोकवस्तीमध्ये झालेल्या घरफोडीत १ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
दौंड पोलिसांनी रविवारी (ता. १९) याबाबत माहिती दिली. शमीम बादशहा शेख (वय ३६, रा. लांडगे वाडा, कुंभार गल्ली, दौंड) या महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शमीम शेख या १७ मार्च रोजी घराला कुलूप लावून मुलासह मैत्रिणीकडे गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी परतल्यावर त्यांना कुलूप तोडून घरातील सोने व चांदीचे ७१ हजार रुपयांचे दागिने आणि रोख ३६ हजार रुपये चोरीस गेल्याचे आढळले. फिर्यादीनुसार अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------