गव्हाची आवक घटल्याने बाजारभाव वधारला

गव्हाची आवक घटल्याने बाजारभाव वधारला

दौंड, ता. २ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात गव्हाची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली आहे. गव्हाची ३१० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान २२०० तर कमाल ३२५१ प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
बाजारात भुसार माल व भाजीपाल्याची आवक आणि बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहे. यवत व पाटस येथील उपबाजारात भुसार मालाची आवक आणि बाजारभाव स्थिर आहेत.
केडगाव उपबाजारात तुरीची तेरा क्विंटल आवक झाली असून प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल किमान ९००० तर कमाल १०००० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. चवळीची चौदा क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल किमान १२००० व कमाल १६५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला आहे.

कोथिंबिरीची ६३६० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल २००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ११३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० तर कमाल २६०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. केडगाव उपबाजारात लिंबाची ६३ डाग आवक झाली असून, प्रतवारीनुसार किमान २५० व कमाल ५६० रुपये प्रति डाग असा बाजारभाव मिळाला आहे.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ३१० २२०० ३२५१
ज्वारी २९४ १८०० ३५००
बाजरी २८९ २००० ३१००
हरभरा ०४९ ५३०० ६३५०
मका ०५६ २१०० २४५०
मूग ०१६ ६६०० ७६००
-----
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-३००, आले-१०००, गाजर-२५०, काकडी-१७०, भोपळा-१८०, कोबी-३००, हिरवी मिरची-७१०, भेंडी-६५०, वांगी-८००, शिमला मिरची-५५०, शेवगा-९००, गवार- ९७०, भुईमूग शेंग-५५०.

टोमॅटो व मिरचीच्या बाजारभावात वाढ
टोमॅटोची ९४ क्विंटल आवक झाली असून प्रतिदहा किलोसाठी प्रतवारीनुसार किमान १०० तर कमाल ६०० रुपये असा दर मिळाला. मागील आठवड्यात टोमॅटोची ९३ क्विंटल आवक झाली असून प्रतिदहा किलोसाठी किमान ७० तर कमाल ५५० रुपये असा बाजारभाव मिळाला.

कांदा ३२०० रुपये प्रतिक्विंटल
केडगाव येथील उपबाजारात कांद्याची ६८७५ क्विंटल आवक झाली प्रतवारीनुसार किमान १४०० तर कमाल ३२०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात कांद्याची १०८६६ क्विंटल आवक झाली प्रतवारीनुसार किमान १३०० तर कमाल ३१०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com