दौंडमध्ये गव्हाची १४७५ क्विंटल आवक
दौंड, ता. १० : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात गव्हाची आवक ५३६ क्विंटलने वाढली आहे. बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ११ रुपयांची वाढ झाली आहे. तालुक्यात गव्हाची एकूण १४७५ क्विंटल आवक असून, त्यास प्रतवारीनुसार किमान २३०० तर कमाल ३२११ प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहेत. केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहेत. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे.
दौंड बाजारात कोथिंबिरीची १३८०५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ७०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची २९०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल ११०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपुची ४५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल ७०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. कांदा पातीची १०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० तर कमाल ४०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
केडगाव उपबाजारात लिंबाची ३१ डाग आवक झाली आहे. त्यास प्रतवारीनुसार किमान १३५० व कमाल २२०० रुपये प्रतिडाग असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात लिंबाची २३ डाग आवक झाली असून, प्रतवारीनुसार किमान १२०० व कमाल २४०१ रुपये प्रतिडाग असा बाजारभाव मिळाला होता.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू १४७५ २३०० ३२११
ज्वारी ०४६६ २२०० ४१००
बाजरी ०१४७ २२०० ३१००
हरभरा ०१५२ ५००० ५९००
मका ००४७ १९५० २२५०
तूर ००४७ ५५०० ६५००
प्रतिदहा किलोसाठीचे कमाल बाजारभाव : बटाटा-२००, आले-४००, गाजर-३५०, काकडी-२१०, भोपळा-१५०, कोबी-७०, फ्लॅावर-१९०, टोमॅटो-१२५, हिरवी मिरची-५५०, भेंडी- ४१०, वांगी-२००, गवार-७००, लिंबू- ११००, वटाणा-५००, कलिंगड-१३०, खरबूज-१९०.
कांद्याची आवक वाढली, दर स्थिर
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक दुपटीने वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. कांद्याची एकूण १२८७६ क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान ५०० तर कमाल १७०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
खरबूज, कलिंगड व गाजराच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात खरबुजाची १७२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ४० तर कमाल १९० रुपये असा बाजारभाव मिळाला. कलिंगडाची १६५ क्विंटल आवक होऊन, त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल १३० रुपये असा बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

