दौंड तालुक्यात ज्वारी ३८०० रुपये क्विंटल

दौंड तालुक्यात ज्वारी ३८०० रुपये क्विंटल

Published on

दौंड, ता. ६ : दौंड तालुक्यात ज्वारीची १३० क्विंटल आवक वाढली आहे. प्रतवारीनुसार ज्वारीच्या बाजारभावात प्रतिक्विंटल तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. ज्वरीला किमान २००० तर कमाल ३८०० प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाजांची आवक घटली आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून एकूण ८१४८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल १८०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ९६१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ६०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ५२९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल १००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपुची ३०९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ६०० रुपये असा बाजारभाव मिळाला.


शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रू.)
गहू ५२९ २३०० ३०५०
ज्वारी १३० २००० ३८००
बाजरी ४०४ २००० ३०००
हरभरा ०४४ ५००० ५९१०
मका ०२४ १९०० २५००
तूर ०१४ ५५०० ५८००


दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-२००, आले-३००, गाजर-३००, पेरू-३००, काकडी-२००, भोपळा-१८०, कोबी-११०, फ्लॅावर-१८०, टोमॅटो-२७५, हिरवी मिरची-६५०, भेंडी-४००, कार्ली- ४००, दोडका-४००, वांगी-५००, शिमला मिरची-४००, गवार-१२००, घेवडा -६००, लिंबू - २५०.

डाळिंबाची ६३६५ क्रेट आवक
केडगाव उपबाजारात डाळिंबाची आवक वाढली आहे. डाळिंबाची ६३६५ क्रेट आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १४० रुपये, असा भाव मिळाला. मागील आठवड्यात डाळिंबाची ६२२३ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १५० रुपये असा भाव मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com