दौंडमध्ये गव्हाचा बाजारभाव वधारला

दौंडमध्ये गव्हाचा बाजारभाव वधारला

Published on

दौंड, ता. १४ : दौंड तालुक्यात गव्हाची आवक वाढली आहे. बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल पन्नास रुपयांची वाढ झाली आहे. गव्हाची एकूण ७१२ क्विंटल आवक असून त्यास प्रतवारीनुसार किमान २६०० तर कमाल ३१०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक आणि बाजारभावात वाढ झाली आहे. पाटस उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर यवतचा उपबाजार बंद होता. दौंड मुख्य बाजारात पालेभाजांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
केडगाव उपबाजारात डाळिंबाची २०७० क्रेट आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १०० रुपये असा बाजारभाव मिळाला. दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १११०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ६०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ४३५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल १००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.


शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ७१२ २६०० ३१००
ज्वारी १२४ २१०० ३८५०
बाजरी ३४५ २००० ३२००
हरभरा ०७४ ५००० ५८७०
मका ०३३ १९०० २५००
तूर ०१० ५००० ६१००
मूग ३१२ ६००० ९१००

भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-२००, आले-३५० , गाजर-३००, पेरू-३००, काकडी-१५०, भोपळा-१५०, कोबी-१५०, फ्लॅावर-२००, टोमॅटो-३५०, घेवडा - ३५०, बिट - २००, वाटाणा - ८००, डाळिंब - ६००.
-----
टोमॅटो, कोबी, कांद्याच्या बाजारभावात वाढ
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची २४१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ३५० रुपये बाजारभाव मिळाला. कोबीची ५७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल १५० रुपये असा दर मिळाला. केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून एकूण ७५२० क्विंटल आवक झाली. प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल १८०० रुपये प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com