केडगावला डाळिंबाची १७३८ क्रेट आवक

केडगावला डाळिंबाची १७३८ क्रेट आवक

Published on

दौंड, ता. १८ : केडगाव उपबाजारात डाळिंबाच्या आवक व बाजारभावात वाढ झाली आहे. डाळिंबाची १७३८ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १७० रुपये बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस येथील उपबाजारात भुसार मालाची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाजांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून एकूण क्विंटल ६६११ आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १५० तर कमाल १७०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. केडगाव येथे पेरूची २१० क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो १७ ते २८ रुपये बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १११५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ६०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.

दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव : (प्रति दहाकिलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-१८०, आले-३००, गाजर-३००, पेरू-२५०, काकडी-१५०, भोपळा-१००, कोबी-८०, फ्लॅावर-३००, टोमॅटो-१५०, हिरवी मिरची-४००, भेंडी-३००, कार्ली-३००, दोडका - ४००, वांगी - ३००, शिमला मिरची-५००, गवार-८५०,

कोबी, काकडी व मिरचीच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात कोबीची ५९ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ३० तर कमाल ८० रुपये असा बाजार मिळाला. काकडीची १२१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल १५० रुपये बाजारभाव मिळाला.

Marathi News Esakal
www.esakal.com