दौंड तालुक्यात कांद्याची आवक घटली
दौंड, ता. १ : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असली तरी तब्बल सव्वा महिन्यानंतर बाजारभाव १८०० रुपये क्विंटलपेक्षा अधिक झाला आहे. कांद्याची ६२३० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १५० रुपये; तर कमाल १९०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ६३७२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १५० रुपये; तर कमाल १७०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. तर केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून बाजारभावात तेजीत आहे. केडगाव उपबाजारात डाळिंबाच्या आवक वाढली असून बाजारभावात घट झाली आहे. डाळिंबाची ३४६५ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १५० रुपये, असा भाव मिळाला, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली.
टोमॅटो, बटाटा व कोबीच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची १९५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०२५ तर कमाल १७० रुपये, असा दर मिळाला. बटाट्याची २२५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १७० तर कमाल १९० रुपये, असा दर मिळाला. कोबीची ५२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल १२५ रुपये, असा दर मिळाला.
कोथिंबीर व शापूच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ११६७५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल १६०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. तर मेथीची १४०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ८०० रुपये, तर कमाल २००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा- १९०, आले- ३००, गाजर- ३००, पेरू- २००, काकडी- २५०, भोपळा- १७०, कोबी- १२५, फ्लॅावर- २००, टोमॅटो- १७०, हिरवी मिरची- ३५०, भेंडी- ६००, कार्ली- ३००, दोडका- ५००, वांगी- ४००, शिमला मिरची- ५००, गवार- १६००, घेवडा- ३५०, बिट- २५०, डाळिंब- ६००, मका कणीस- १५०, लिंबू- ४००.
शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रू.)
गहू ७२४ २३०० ३०१०
ज्वारी ०८४ २२०० ३६००
बाजरी ४२३ १८०० ३२००
हरभरा ०४६ ४५०० ५५००
मका ०२१ २१०० ३३००
उडीद १२९ ४५०० ६१००
तूर ००८ ५००० ५५००
मूग ०६१ ६५०० ८०००
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.