दौंडला ज्वारीची १०३ क्विंटल आवक
दौंड, ता. ८ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात ज्वारीची १०३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान २१०० तर कमाल ४२११ रुपये बाजारभाव मिळाला.
केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. तर पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. मागील महिन्यात झालेल्या पावसानंतर दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून बाजारभावात तेजीत आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची ८६१६ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ३००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची १३७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० तर कमाल २६०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
केडगाव उपबाजारात कांद्याची ८७७३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १५० तर कमाल १७०० प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तर डाळिंबाची ७३३ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १५० रुपये बाजारभाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ८६६ २४०० ३१०१
ज्वारी १०३ २१०० ४२११
बाजरी ८०४ १७०० ३२००
हरभरा ५७ ४४०० ५५००
मका १५४ १९०० २४०१
उडीद २४१ ४००० ५६००
तूर ००७ ४८०० ५४००
मूग ०९४ ५००० ८२००
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल बाजारभाव) : बटाटा-१९०, आले-४००, गाजर-४००, पेरू-२५०, काकडी-२५०, भोपळा-२००, कोबी-१५०, फ्लॅावर-२००, टोमॅटो-२००, हिरवी मिरची-७००, भेंडी-३००, शिमला मिरची-६०, मका कणीस-१५०, लिंबू-५००.
टोमॅटो, वांगी व कोबीच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची २३५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ०२५ तर कमाल २०० रुपये, असा दर मिळाला. वांगीची ३८ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १०० तर कमाल ५२० रुपये, असा दर मिळाला. कोबीची ४८ क्विंटल आवक होऊन त्यास किमान ०५० तर कमाल १५० रुपये, असा दर मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.