दौंडमध्ये पालेभाज्यांच्या बाजारभावात तेजी
दौंड, ता. १५ : दौंड तालुक्यात मुगाची आवक घटली असून, बाजारभावात प्रतिक्विंटल तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. मुगाची ४३ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान ५००० तर कमाल ८५०० रुपये बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह केडगाव, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहेत पावसाने उघडीप दिल्याने दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून बाजारभावात तेजी आहे.
दौंड बाजारात कोथिंबिरीची ११२२७ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० व कमाल २५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची १३७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० तर कमाल २६०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची ३०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल १००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. केडगाव उपबाजारात कांद्याची ११६६८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १५० तर कमाल १६०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
केडगाव उपबाजारात डाळिंबाची ३७६ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १२० रुपये असा बाजारभाव मिळाला. पेरूची १८५ क्रेट आवक झाली.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रू.)
गहू १३४२ २३०० ३१००
ज्वारी ०१३३ १८०० ३६२०
बाजरी ०९७९ १७२५ ३२००
हरभरा ०७५ ४२०० ५६३१
मका ३५१ १७०० २२००
उडीद १८१ ३७०० ५५५१
तूर ०१६ ४५०० ५५००
मूग ०४३ ५००० ८५००
भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल बाजारभाव) : बटाटा-१९०, आले-५००, गाजर-४००, पेरू-२५०, काकडी-३५०, भोपळा-२००, कोबी-१२५, फ्लॅावर-२५०, टोमॅटो-१५०, हिरवी मिरची-५००, भेंडी -३६०, कार्ली-४००, डाळिंब-८००, मका कणीस-१००, लिंबू - ३५०.
काकडी, भेंडी व दोडक्याच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात काकडीची ८५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल ३५० रुपये असा बाजारभाव मिळाला. भेंडीची ४२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ३६० रुपये असा बाजारभाव मिळाला. दोडक्याची २८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ६०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.