दौंडला भुसार मालाचे भाव स्थिर

दौंडला भुसार मालाचे भाव स्थिर

Published on

दौंड, ता. २५ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक कमी झाली असून बाजारभाव स्थिर आहे. तर पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात डाळिंबाची २७० क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो ०३० ते १५० रुपये, असा भाव मिळाला. मागील आठवड्यात डाळिंबाची ३७६ क्रेट आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार प्रतिकिलो २५ ते १२० रुपये, असा भाव मिळाला होता. एका क्रेट मध्ये सरासरी वीस किलो डाळिंब असतात, अशी माहिती , अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे.

दौंड बाजारात कोथिंबिरीची १७४६८ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ०३०० व कमाल १२०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची १११० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०००, तर कमाल ३०५० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. शेपूची १०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० तर कमाल १४०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. केडगाव उपबाजारात कांद्याची ५४२६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०१५० तर कमाल १६०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.
गहू ३२० २३०० २९००
ज्वारी ००३ २९०० ३६१०
बाजरी ११५ १७०० ३२००
हरभरा ००३ ४४०० ५२००
मका ०७२ १४०० २११०

भोपळा, कोबी व गवारीच्या दरात वाढ
दौंड मुख्य बाजारात भोपळ्याची २१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल २२० असा बाजारभाव मिळाला. कोबीची ६० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल १५० रुपये असा बाजारभाव मिळाला. गवारीची १३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रत दहा किलोसाठी किमान ५०० तर कमाल २२५० रुपये असा दर मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com