दौंडमधील बाजारात कांदा 
२५०० रुपये प्रतिक्विंटल

दौंडमधील बाजारात कांदा २५०० रुपये प्रतिक्विंटल

Published on

दौंड, ता. ९ : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तब्बल पाचशे रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. कांद्याची ८९६० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० रुपये; तर कमाल २५०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ९६९५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० रुपये; तर कमाल २००० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक स्थिर असून, बाजारभावात तेजी आहे.
दौंड बाजारात कोथिंबिरीची १२४०८ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ७०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ७४५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल २००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. शेपूची ३२० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल १००० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. कांदापातीची २१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल १४०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची १५१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल ३५० रुपये, असा दर मिळाला. भेंडीची २३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ८०० रुपये, असा दर मिळाला. काकडीची ४८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल २५० रुपये, असा दर मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com