दौंड बाजारात तुरीचा भाव वधारला
दौंड, ता. २७ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात तुरीची आवक वाढली असून बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ४१० रुपयांची वाढ झाली आहे. तुरीची १७२ क्विंटल आवक झाली असून त्यास किमान ५५०० तर कमाल ६६०० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
बाजारात भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक आणि बाजारभाव स्थिर आहे, केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून बाजारभावात प्रतिक्विंटल तब्बल पाचशे रुपयांची घट झाली आहे.
अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १३२९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा कमाल १५०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची १०४७० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ०२०० तर कमाल १००० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ३५३ २३५० ३१००
ज्वारी ०५६ १९०० ४५००
बाजरी ३९४ २००० ३३००
उडीद ०१४ ४००० ५५००
मूग ००३ ५००० ६५००
हरभरा ०१४ ४८०० ५३००
तूर १७२ ५५०० ६६००
मका १५९ १५०० २०००
बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-१६०, आले-५००, गाजर-२५०, पेरू-१५०, काकडी-४००, भोपळा- १५०, कोबी-२००, फ्लॅावर-२००, टोमॅटो-४५०, हिरवी मिरची-५५०, बिट-२५०, मका कणीस - २००, लिंबू - ३००.
काकडी, मिरची व टोमॅटोच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात काकडीची ५२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल ४०० रुपये असा बाजारभाव मिळाला. हिरव्या मिरचीची ५१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान २५० तर कमाल ५५० रुपये, असा बाजारभाव मिळाला. तर टोमॅटोच्या प्रतिदहा किलोसाठी किमान ०५० तर कमाल ४५० रुपये बाजारभाव मिळाला.

