दौंडमधील बाजारात तूर ७५४५ रुपये क्विंटल
दौंड, ता. २९ : दौंड तालुक्यात तुरीची आवक घटली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल ४३४ रुपयांची वाढ झाली आहे. तुरीची ११६ क्विंटल आवक झाली असून, त्यास किमान ६४०० तर कमाल ७५४५ रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात तुरीची ११८ क्विंटल आवक होऊन त्यास किमान ५५०० तर कमाल ७१११ रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारासह पाटस आणि यवत येथील उपबाजारांत भुसार मालाची आवक कमी झाली असून, बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीच्या ८९७० जुड्या आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल १००० रुपये असा बाजारभाव मिळाला. मेथीच्या ७४०० जुड्या आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये, तर कमाल ५०० रुपये, असा बाजारभाव मिळाला. शेपूच्या २०० जुड्या आवक होऊन त्यास शेकडा कमाल ६०० रुपये, असा बाजारभाव मिळाला.
तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक किमान कमाल
(क्विंटल) (रु.) (रु.)
गहू ४८२ २३०० ३१००
ज्वारी ०८९ २१०० ४५००
बाजरी २५३ २००० ३१००
उडीद ००८ ४००० ५३१०
हरभरा ०१९ ४२०० ५२००
तूर ११६ ६४०० ७५४५
मका १३२ १६५० १९००
दौंड मुख्य बाजारात भाजीपाला व फळांना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर ) : बटाटा - १४०, आले - ५००, गाजर - २५०, पेरू - १५०, काकडी -४००, भोपळा - १५०, कोबी - १५०, फ्लॅावर - ३००, टोमॅटो - १६०, हिरवी मिरची - ८००, भेंडी - ६००, कारली - ७००, दोडका - ६००, वांगी - ३००, शिमला मिरची - ४००, वाटाणा - ४००, घेवडा - २००, बीट - १५०, लिंबू - ३००.
■ टोमॅटो, कोबी व मिरचीच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची २१० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५० तर कमाल १६० रुपये, असा दर मिळाला. कोबीची ३६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १०० तर कमाल १५० रुपये, असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ३०० तर कमाल ८०० रुपये, असा दर मिळाला.
---------
■ केडगावमध्ये कांद्याची आवक वाढली
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक वाढली असून, बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची घट झाली आहे. कांद्याची १३२८२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० रुपये, तर कमाल १८०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची १०१२१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० रुपये, तर कमाल २१०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.

