डोर्लेवाडी-पंढरपूर सायकलवारीतून अजित पवार यांना आदरांजली

डोर्लेवाडी-पंढरपूर सायकलवारीतून
अजित पवार यांना आदरांजली
Published on

डोर्लेवाडी, ता. २६ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच त्यांच्या आत्म्यास चिरशांती व वैकुंठप्राप्ती लाभावी, या उद्देशाने डोर्लेवाडी (ता. बारामती) ते पंढरपूर डोर्लेवाडी सायकल क्लबच्या वतीने सायकलवारी काढण्यात आली.

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजूनही जनता या दुःखातून बाहेर आलेली नाही.बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान, प्रशासनातील शिस्त, पर्यावरणाबाबतची जागरूकता आणि समाजातील एकात्मतेसाठी केलेल्या कार्याची आठवण कायम राहावी व त्यांच्या विचारांचा वारसा समाजात जपला जावा, या भावनेतून या सायकलवारीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुभाष ढोबळे यांनी दिली.

ही सायकल मोहीम पहाटे तीन वाजता डोर्लेवाडी येथील संत तुकाराम महाराज मंदिर येथून दर्शन घेऊन सुरू झाली. सायकलस्वारांनी कळंब, नातेपुते, माळशिरस मार्गे सुमारे ११० किलोमीटरचा प्रवास करत सकाळी नऊच्या दरम्यान पंढरपूर गाठले. मार्गात विविध ठिकाणी ग्रामस्थांनी सायकलस्वारांचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहन दिले. काही ठिकाणी अल्पोपाहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती.
पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर सर्व सायकलस्वारांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले व दिवंगत अजित पवार यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थना केली. तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वच्छता, वृक्षारोपण आदी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्पही या वेळी केला.
या सायकलवारीत डोर्लेवाडी येथील सुभाष ढोबळे, राजाभाऊ शिंदे, सोमनाथ भिले, विजय निकम, महेश बोराटे आदींनी सहभाग घेतला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डोर्लेवाडी सायकल क्लबच्या मनोज काळेबेरे, दीपक नाळे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले. डोर्लेवाडी सायकल क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.


DOR26B01282, DOR26B01283

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com