राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात देऊळगाव राजे येथे विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात
देऊळगाव राजे येथे विविध उपक्रम
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात देऊळगाव राजे येथे विविध उपक्रम

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात देऊळगाव राजे येथे विविध उपक्रम

sakal_logo
By

देऊळगाव राजे, ता. १५ : देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे दौंड येथील किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर पार पडले. यामध्ये स्वच्छ भारत अभियान, आरोग्य जागर, वृक्षारोपण यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. याचे उद्‍घाटन ए. सी. दिवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे यांच्या हस्ते झाले.

या वेळी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, देऊळगावच्या सरपंच स्वाती गिरमकर, उपसरपंच शुभांगी गिरमकर, अमित गिरमकर, तुकाराम आवचर, जगन्नाथ बुऱ्हाडे, अभिमन्यू गिरमकर, विष्णुपंत सूर्यवंशी, अमीर शेख, कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर गाडेकर आदी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांची रोटरी क्लब दौंड व देऊळगाव राजे ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश दाते यांनी मार्गदर्शन केले.

सांगता प्रसंगी विद्यार्थ्यांना दौंडचे पोलिस निरिक्षक भाऊसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विक्रम कटारिया, गोविंद अग्रवाल, अमित गिरमकर, जगन्नाथ बुऱ्हाडे, कांतिलाल आवचर, सचिन पोळ, विष्णुपंत सूर्यवंशी, जयवंत गिरमकर, काकासाहेब कड आदी उपस्थित होते. शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर गाडेकर व सदस्य डॉ. जयश्री लोहगावकर यांनी केले.