Wed, March 22, 2023

राजेगाव येथील शाळेच्या
संरक्षक भिंतीचे उद्घाटन
राजेगाव येथील शाळेच्या संरक्षक भिंतीचे उद्घाटन
Published on : 6 February 2023, 8:45 am
देऊळगाव राजे, ता. ६ : राजेगाव (ता. दौंड) येथील प्राथमिक शाळेला स्वखर्चाने बांधून दिलेल्या ४८० फूच लांबीच्या संरक्षक भिंतीचे उद्घाटन उघोजक हनुमंत पानसरे व त्यांच्या पत्नी प्रतिभा पानसरे यांच्या हस्ते केले.
संरक्षक भिंतीसाठी शासकीय पातळीवर अनेक प्रयत्न केले असता त्याचे काम मार्गी लागले नसल्यामुळे मुख्याध्यापक अप्पासाहेब मेंगावडे यांनी संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी पानसरे यांच्याकडे केली होती. यावेळी सरपंच प्रवीण लोंढे, नवनीत जाधव, मुकेश गुणवरे, महेश लोंढे, राजेश राऊत, रमेश जाधव, अमोल मोरे, सोपान चोपडे, मनोज भोसले, मुख्याध्यापक मेंगावडे उपशिक्षक आदी उपस्थित होते.