
देऊळगाव राजेत ठिय्या आंदोलन
देऊळगाव राजे, ता.२२ : येथे (ता.दौंड) शेतीपंपाचा खंडित केलेला वीजपुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (ता. २२) एक तास ठिय्या आंदोलन केले. दौंड- सिध्दटेक रोडवर संघटनेचे नेते राजेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दौंड विभागातील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतीपंपाचा वीजपुरवठा मागील आठवड्यात वीजबिल वसुलीसाठी महावितरणने खंडित केला होता. यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. वीजपुरवठा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र कदम यांनी निवेदन देऊन दिला होता. परंतु त्यानंतरही तो सुरू झाला नाही.
निवेदन देताना पोलिस निरिक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, मंडलाधिकारी महेश गायकवाड, सागर सूर्यवंशी, विकास खोसे, जगन्नाथ बुह्राडे, भरत गिरमकर, बाळासाहेब पाचपुते, नवनाथ कदम, राजेंद्र बुह्राडे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनावेळी दौंड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
00192