देऊळगाव राजे परिसरातील शेतकरी सुखावला

देऊळगाव राजे परिसरातील शेतकरी सुखावला

देऊळगाव राजे, ता. ९ : देऊळगाव राजे व परिसरातील गावांमध्ये आठ दिवसांत चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला आहे. चांगल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांना गती मिळणार आहे.

दौंड तालुक्याच्या पूर्व भागात भीमा नदीपात्र कोरडे पडले होते. विहीरी व बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली होती. पाण्यामुळे वडगाव दरेकर, पेडगाव, शिरापूर, हिंगणीबेर्डी, बोरीबेल या गावांमधील पिके करपू लागली होती. यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात होता. मे अखेरीस भीमा नदीला पाणी आले. गेल्या आठ दिवसांत जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला.

वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित
शनिवारी वाऱ्यासह या भागांमध्ये झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडून विद्युत वाहिन्या तुटल्या. काही ठिकाणी खांब पडले. यामुळे वीस तास झाले वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे सांयकाळी काही भाग वगळता देऊळगाव राजेसह परिसरातील गावांमधील वीजपुरवठा सुरू केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com