पुणे
देऊळगाव राजेमध्ये ग्रामसुरक्षा दलास साहित्य वाटप
देऊळगाव राजे, ता. १० : देऊळगाव राजे (ता. दौंड) ग्रामपंचायत आणि रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या वतीने ग्रामसुरक्षा दलातील तरुणांना आवश्यक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, रोटरी क्लब दौंडचे अध्यक्ष दीपक शासम, सचिव प्रज्ञा राजोपाध्ये, माजी सरपंच अमित गिरमकर, पोलिस पाटील सचिन पोळ, ग्रामपंचायत अधिकारी अमीर शेख, रोटरी क्लब सदस्या शालिनी पवार, पायल भंडारी, संजय इंगळे, प्रफुल भंडारी, राकेश अगरवाल, राहुल कडाळे, सांची गजधने, नूतन शासम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सतीश अवचर, माजी उपसरपंच पंकज बुऱ्हाडे, दादासाहेब गिरमकर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक पवार व रोटरीचे अध्यक्ष शासम यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार यांनी केले.