देऊळगावातील संस्थांचे कामकाज समाधानकारक
देऊळगाव राजे, ता. २१ : ‘‘देऊळगाव राजे येथील सर्व संस्थांचे कामकाज अतिशय समाधानकारक आहे. तसेच, गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे,’’ असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केले.
देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी भेट देऊन तेथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायतीस त्यांनी भेट दिली. यावेळी पाटील बोलत होते.
ग्रामपंचायत अधिकारी अमीर शेख यांनी सादरीकरण केलेल्या अभियानाच्या कामकाजाचा पाटील यांनी सखोल आढावा घेतला. गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांमधील समन्वयाबाबत समाधान व्यक्त करत देऊळगाव राजे ग्रामपंचायत ही आदर्श कार्यपद्धतीचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण व कर वसुली आदी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याबाबत पाटील यांनी ग्रामपंचायतीची विशेष प्रशंसा केली. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रातील सर्व कामाची व उपक्रमाची पाहणी करून संवाद साधला. तसेच, जिल्हा परिषद शाळेत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंर्तगत केंद्रस्तरीय स्पर्धेतील खेळाडूंशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रकल्प संचालक शालिनी कडू, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, विस्तार अधिकारी संजय शिंदे, उपअभियंता शिवाजी राऊत, अमित गिरमकर, भीमा पाटसचे संचालक तुकाराम अवचर, दादा गिरमकर, केशव अवचर, हरिभाऊ अवचर, प्रा. दिनेश पवार, पूजा पोळ, क्रांती कुंभार, सुनीता बगाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी केले.
ग्रामपंचायत व शाळेला सोलर संच देणार
ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सोलर संच नसल्याने अडचणी येत असल्याचे भेटीदरम्यान पाटील यांना सांगितले. त्यांनी दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषदेच्यावतीने सौलर संच बसवून देण्यात येतील असे आश्वासन दिले.
देऊळगाव राजे येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी भेट दिली. शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधांची पाहणी करून शाळेच्या कामाबद्दल कौतुक केले. तसेच, उत्कृष्ट क्रीडा स्पर्धेचे आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
-विनायक सूर्यवंशी, मुख्याध्यापक, देऊळगाव राजे
00707
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

