वीरधवल जगदाळे यांना हॅट्ट्रिक भाजपमधील नाराजीमुळे सोपी
देऊळगाव राजे, ता. १२ : दौंड तालुक्यातीलल खडकी- देऊळगाव राजे गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वीरधवल जगदाळे यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली.
निवडणूक काळात अजित पवार यांचे निधन झाले. प्रचारात सहानुभूती मिळवत कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचार केला. यामध्ये अजित पवार यांनी केलेली विकास कामे, तसेच वीरधवल जगदाळे यांनी भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना खेचण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठ्या फरकाने ते विजयी झाले. दौंडच्या राजकारणात एकापाठोपाठ विजय मिळवल्याने जगदाळे राजकारणातील धुरंदर असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
खडकी- देऊळगाव गटात भाजपचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांच प्रस्थ आहे. या गटात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजपने वरिष्ठ पातळीवर वासुदेव काळे यांची मुलगी डॉ. हर्षदा काळे यांची उमेदवारी निश्चित केली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या व उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना नाराज होऊन परतावे लागले. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांना उमेदवारी दिली. मात्र, उमेदवारी देताना वासुदेव काळे यांना अंधारात ठेवण्यात आले. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते या प्रक्रियेतून बाजूला असल्याचे चित्र होते. शिवाय प्रचारातील फलकांवरही वासुदेव काळे यांचे छायाचित्र वापरले नाही. नाराज कार्यकर्त्याना विश्वासात घेण्यात भाजपचे उमेदवार आप्पासाहेब पवार कमी पडले. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत अजित पवार यांच्या निधनामुळे मोठ्या सभा घेण्यात आल्या नाहीत. एकमेकांवर कुठेही टीकाटिप्पणी करताना दिसले नाही. उमेदवार प्रत्येक कार्यकर्ता आपल्या बाजूने येईल, यावर जास्त प्रयत्न करत होते. गटामध्ये मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. त्यामुळे फक्त गाठीभेटी घेण्यावर देण्यात आला. परंतु, वीरधवल जगदाळे यांनी भाजपचा नाराज गट खेचल्याने विजयाची हॅट्ट्रिक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

