Fri, Feb 3, 2023

सचिवपदी शामशेठ होनराव यांची निवड
सचिवपदी शामशेठ होनराव यांची निवड
Published on : 21 January 2023, 2:48 am
घोडेगाव, ता. २१ : येथील (ता. आंबेगाव) श्री हरिचंद्र महादेव संस्थांच्या सचिवपदी श्यामशेठ होनराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येथील घोडेगाव व परिसरातील बारावाड्यावत्यांचे परिसरातील ग्रामदैवत असलेले हे देवस्थान आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर सोबत अनेक शिवभक्त दर्शनासाठी येत असतात व्यापारी श्यामशेठ गंगाधर होनराव यांची विश्वस्त मंडळाच्या सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली. अशी माहिती संस्थांनचे अध्यक्ष प्रशांत काळे यांनी दिली.देवस्थानचे दिवंगत सचिव कै.नवनाथ बबनराव काळे यांच्या निधनानंतर सचिव पदाची जागा रिक्त झाली होती. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
01973