Sat, June 10, 2023

शिनोलीत तलाठ्यास
लाच घेताना पकडले
शिनोलीत तलाठ्यास लाच घेताना पकडले
Published on : 24 March 2023, 3:26 am
घोडेगाव, ता. २४ : शिनोली (ता. आंबेगाव) येथील तलाठी विलास शिगवण यास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (ता. २४) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्याने सात बारा उताऱ्यावरील नावात दुरुस्ती करावी, यासाठी सन २०२१ रोजी अर्ज केला होता. परंतु, नावात बदल होत नव्हता. त्यामुळे वैतागून संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. शुक्रवारी दुपारी सापळा रचून शिनोली येथे तलाठी कार्यालयात १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी शिगवण यास पकडले. रात्री उशिरापर्यंत घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.