आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी घोडेगावातील कीर्ती हिची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी घोडेगावातील कीर्ती हिची निवड
आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी घोडेगावातील कीर्ती हिची निवड

आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी घोडेगावातील कीर्ती हिची निवड

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २९ : येथील बी.डी.काळे महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.बी.ए.या वर्गातील खेळाडू कीर्ती राजेंद्र घाटगे हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. म्हैसूर (कर्नाटक) येथे ही स्पर्धा ५ ते ११ एप्रिल २०२३ दरम्यान होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट संघाच्या भुवनेश्वर (ओडिसा) येथे झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेतून म्हैसूर येथे निवड झाल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी दिली आहे. नुकत्याच भुवनेश्वर (ओरिसा) येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत कीर्ती हिने उत्कृष्ट गोलंदाजी करीत संघात स्थान पक्के केले. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेतूनच तिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कीर्तीला क्रीडा संचालक प्रा. भाऊसाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले आहे. तिच्या उज्वल यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, सचिव अक्षय काळे, कार्याध्यक्ष श्‍याम होनराव, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड.मुकुंद काळे, संस्थेचे सर्व संचालक, प्राध्यापक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
...................................
02133