आंबेगावमध्ये १७ सप्टेंबरला महसूल लोकअदालत

आंबेगावमध्ये १७ सप्टेंबरला महसूल लोकअदालत

Published on

घोडेगाव, ता.११ : आंबेगाव तालुक्यात प्रलंबित महसूली दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने बुधवारी (ता. १७) घोडेगाव तहसील कार्यालय, मंचर प्रांत कार्यालय आणि मंडल अधिकारी कार्यालयात महसूल लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबेगाव जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. या लोकअदालतीचा उद्देश विभागावरील ताण कमी करून नागरिकांना जलद व खर्चमुक्त न्याय मिळवून देणे हा आहे. या संदर्भात कामकाजाचे नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, शुक्रवारी (ता. १२) पक्षकारांना नोटिसा दिल्या जाणार आहेत.
अर्ज दाखल करण्याचा कालावधी १५ सप्टेंबरपर्यंत राहील. या दिवशी अर्जांची छाननी व पूर्वतयारी बैठक होईल. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष लोकअदालत पार पडणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा
या अभियानाच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील व मंडल अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयांत माहितीफलक प्रसिद्ध केले जातील. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधाही उपलब्ध असून, अर्ज संबंधित अधिकाऱ्यांच्या ई- मेलवर स्वीकारले जातील. अर्जदारांना तडजोडनामा तयार करण्याबाबत पूर्वतयारी बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार संजय नागटिळक व नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com