प्रहारतर्फे नागटिळक, संतोषवार यांचा सत्कार
घोडेगाव, ता. १५ : दिव्यांग बांधवांना अंत्योदय अन्न योजना जलदगतीने उपलब्ध करून दिला म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे शुक्रवारी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संजय नागटिळक आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी माधुरी संतोषवार यांचा सत्कार करण्यात आला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र भालेराव यांच्या हस्ते संजय नागटिळक यांचा तर माधुरी संतोषवार यांचा खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कामात कार्यकुशलता आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी ओळख असलेल्या तहसीलदार संजय नागटिळक यांची उपजिल्हाधिकारी पदावर झालेल्या बढती बद्दल संघटनेतर्फे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी त्यांच्या संवेदनशील व तत्पर निर्णयक्षमतेचे कौतुक केले. सत्कारानंतर प्रहार खेड तालुका अध्यक्ष सुनील जाधव यांच्या वतीने तहसील कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले. त्यानंतर पुढील उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेचे सक्षम नाणेकर, भानुदास लोंढे, नरेन थोरात, पांडुरंग काळे, सुनील दरेकर, भगवान बोराडे, प्रकाश कोकणे, मोहन भालेराव, सनी बाबा कोकणे, नरेंद्र गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
4463

