आंबेगावातील महिलांसाठी उपजीविका, उद्योजकता प्रशिक्षण

आंबेगावातील महिलांसाठी उपजीविका, उद्योजकता प्रशिक्षण

Published on

घोडेगाव, ता. २८ : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, आंमोडी व डिंभा बुद्रूक येथे उपजीविका व उद्योजकता प्रशिक्षणात बचत गटांतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
आंबेगाव तालुक्यात यशवर्धिनीच्या मार्गदर्शनातील बचत गटांतील गरीब व गरजू महिलांना यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण भारतात २०१४ पासून कार्यरत असणाऱ्या एफडब्लूडब्लूबी संस्थेच्या माध्यमातून महिला उपजीविका आणि उद्योजकता कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिलांना उपजीविका व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून यामध्ये आर्थिक शिक्षण, व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये, मार्केट लिंकेज, उत्पादन वैविध्य आणि इतर जोडण्यांवर क्षमता-निर्मिती इनपुट प्रदान केले जात आहे. प्रामुख्याने ज्यामुळे महिलांना स्वावलंबी बनता येईल, त्यांचे छोटे व्यवसाय वाढतील आणि त्यांना त्यांच्या कुटुंबात समान दर्जा मिळेल. या उद्देशाने आंबेगाव तालुक्यात बचत गटांतील महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम तालुक्यात गावोगावी वाड्यावस्त्यांवरील महिलांच्या घराजवळील स्वयंसहाय्यता विभागांच्या केंद्र व समाजमंदिरांमध्ये व्यावहारिक आणि सिद्धांत शिक्षण अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रमाणपत्र प्रशिक्षण देण्यात येत आहे. ‘‘प्रशिक्षण प्रकल्प कालावधी आणि प्रशिक्षणासाठी १०० टक्के वेळ बचत गटातील महिलांनी द्यावा,’’ असे आवाहन यशवर्धिनीचे कार्यकारी अधिकारी कुमार घोलप यांनी केले . ‘‘महिलांना FWWB द्वारे प्रदान केले जाणारे कार्यपुस्तक व प्रात्यक्षिक आत्मसात करावे. वेळच्या वेळी डायरी मार्गदर्शनपर टिप्स लिहून घेत त्यानुसार अभ्यास करत कौशल्य आत्मसात करावे,’’ असे महिलांना मार्गदर्शन करताना संघाच्या लेखापाल कल्पना एरंडे यांनी सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रम गावोगावी राबविण्यासाठी संघाच्या सर्व पदाधिकारी व संघ कार्यकर्ते सुहास वाघ, हरिभाऊ गेंगजे, शिवाजी शेटे विशेष प्रयत्न करत आहे. राजश्री पवार व काजल लोढे या प्रशिक्षक महिलांनी प्रशिक्षण देत आहेत.

4515

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com