गावगाडा प्रशासनाच्या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावगाडा प्रशासनाच्या हाती
गावगाडा प्रशासनाच्या हाती

गावगाडा प्रशासनाच्या हाती

sakal_logo
By

गुळुंचे, ता. १२ : जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे गावगाड्याचा कारभार आता गावकारभाऱ्यांच्या हातातून प्रशासकांकडे गेला आहे. जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली आहे.

विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती
ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर पडल्याने प्रशासकांची नेमणूक करण्याबाबत शासनाने यापूर्वीच आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत. प्रशासक म्हणून ग्रामसेवकपदापेक्षा वरिष्ठ कर्मचारी प्रशासक म्हणून नेमण्याची तरतूद आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

गैरवर्तणूक झाल्यास कारवाई
प्रशासकांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८-५९; तसेच ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील तरतुदीप्रमाणे सरपंचपदाचे अधिकार मिळणार आहेत. मात्र, प्रशासकपदी नियुक्त केलेल्यांकडून कामात हयगय किंवा गैरवर्तणूक झाल्यास प्रशासकांना पदावरून काढले जाईल, असे स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

प्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या
शिरूर- १
खेड- १
पुरंदर-२
वेल्हे- ४
हवेली- ४
आंबेगाव- ९
भोर- १०
मुळशी- ११
मावळ- ११
बारामती- १५
जुन्नर-१९

निवडणूक विभागाने लवकर निवडणुका घ्याव्यात. प्रशासक नेमल्याने गावातील विकासकामे करताना अडचणी येतात. वास्तविक, पुरंदर तालुक्यातील गुळुंचे व कर्नलवाडी या गावांच्या निवडणुका मागील टप्प्यात होणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाच्या हलगर्जीपणाने या दोन पंचायतींची नावेच जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली नाहीत. त्यामुळे आज प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे.
- नितीन निगडे, ग्रामस्थ, गुळुंचे (ता. पुरंदर)

पुरंदर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत गुळुंचे आणि कर्नलवाडीची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. आदेश आला आहे. निवडणूक होईपर्यंत प्रशासक राहील.
- सुहास कांबळे, विस्तार अधिकारी, पुरंदर पंचायत समिती

प्रशासक नेमेलेल्या ग्रामपंचायती
शिरूर- ....
खेड- ....
पुरंदर- ....
वेल्हे- ...
हवेली- ...
आंबेगाव- ...
भोर- ....
मुळशी- ....
मावळ- ...
बारामती- ...
जुन्नर- ...