नीरा येथे स्पर्धा परीक्षेची कार्यशाळा

नीरा येथे स्पर्धा परीक्षेची कार्यशाळा

Published on

गुळुंचे, ता. ८ : नीरा (ता.पुरंदर) येथील प्राचार्य श्रीमंतराव भोसले प्रतिष्ठान यांच्या वतीने येथील रयत संकुलातील लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात पार पडली.
कार्यशाळेचे उद्‌घाटन कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मी पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. स्पर्धा परीक्षेसाठीची आवश्यक माहिती पर्स्पेक्टिव्ह ॲकॅडमी, पुणे येथील डॉ. अमर जगताप व युनिक अॅकॅडमीचे संचालक हर्षल लवंगारे यांनी विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य श्रीमंतराव भोसले प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. संजय भोसले यांनी विद्यार्थ्यांना यश संपादनासाठीचे मार्ग व अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले. यावेळी भोसले यांनी विद्यार्थ्यांनी शाळेतील बेसिक ६ वी ते १२ वी चे क्रमित पुस्तकांचा दीर्घ अभ्यास करणे गरजेचे आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान आणि नागरिकशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला पाहिजे.

प्राचार्य श्रीमंतराव भोसले प्रतिष्ठानचे रमेश बेजेकर, शांतीकुमार कोठडिया, डॉ. संजय भोसले, दत्तात्रेय निगडे, लोणी, भारत फोर्जचे कदम, डॉ. अनिल निंबाळकर, नीलिमा घाडगे, प्रदीप काकडे, बंडू काकडे, तसेच सर्व शिक्षकांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
गांधी विद्यालयाचे उपशिक्षक कुंभार यांनी प्रास्ताविक तर शहा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी आभार मानले.

01321

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.