Wed, March 29, 2023

गुळुंचे येथे मंदिरात आकर्षक सजावट
गुळुंचे येथे मंदिरात आकर्षक सजावट
Published on : 19 February 2023, 2:32 am
गुळुंचे, ता. १९ : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी भाविकांनी रांगा लावून शिवलिंगाचे दर्शन घेतले.
देवस्थानचा ‘ब’ वर्ग दर्जा असलेले ज्योतिर्लिंग मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सकाळी पंच पाटील हनुमंत निगडे यांच्या हस्ते महादेवास अभिषेक घालण्यात आला. अजित मांडके यांनी पौरोहित्य केले. दानशूर व्यक्ती व तरुणांनी सकाळी फराळाचे वाटप केले. रात्री मंदिरात कीर्तन होणार असून लघुरुद्र करण्यात येणार असल्याचे गुरव प्रशांत शिंदे यांनी सांगितले. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिराची आकर्षक सजावट केली होती. गाभाऱ्यात बेलाची पाने, फुले, गुलाबाच्या पाकळ्या व फुलांच्या हारांनी आकर्षक सजावट करण्यात आली.